पद्मसिंह यांच्या कुलाब्यातील घरावर सीबीआयचा छापा

June 19, 2009 7:26 AM0 commentsViews: 2

19 जून पद्मसिंह पाटील यांच्या कुलाब्यातल्या घरावर सीबीआयने घातलेल्या छाप्यात 4 पिस्तुलं जप्त केली असून काही महत्त्वपूर्ण धागेदोरेही सापडले आहे. गुरुवारी दुपारी 3.00 वाजता पोलिसांनी छापा घातला होता. या छाप्यात सीबीआयने काही तलवारी जप्त केल्या आहेत. तर साडे सात लाख रुपयांची रोख रक्कमही सीबीआयला सापडली आहे. तसंच निंबाळकर यांच्या खूनप्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रही सापडली आहेत. याचबरोबर अत्याधुनिक वॉकीटॉकी, आणि कॉम्प्युटर्सही जप्त करण्यात आले आहेत. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने 24 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

close