विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे

November 12, 2014 1:53 PM1 commentViews:

photo12 नोव्हेंबर :शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. आवाजी मतदानात विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यानंतर त्या गोंधळातचं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शिवसेनेला विरोधीपक्ष म्हणूज जाहीर करत एकनाथ शिंदेंची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी पाचपाखडी येथील आमदार आहेत.

दिलेला ‘शब्द पाळणारा नेता’ अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे गेली अनेक वर्ष शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. किसन नगरातला एक आक्रमक शाखाप्रमुखापासून त्यांनी राजकारणातला प्रवास सुरू केला. त्यानंतर ठाणे महापालिकेत नगरसेवक, सभागृहनेता, जिल्हाप्रमुख, गेली 10 वर्षे आमदार अशी यशस्वी वाटचाल करणार्‍या एकनाथ शिंदे यांची आता विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यातील पालिका आणि नगरपालिकांमध्ये भगवा फडकवत ठेवण्यात शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. पालिका आणि नगरपालिकांमधल्या सत्तेचं गणित जुळवण्यात त्यांचा हातखंडा आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण-डोंबिवली मतदारसंघातून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदेंची विरोधीपक्षनेते म्हणून निवड झाल्यामुळे आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडून त्यांना राज्यभरात आपला कामाचा ठसा उमटवण्याची संधी मिळाली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Mahesh Deshmukh

    Great…

close