भाजपचं मिशन ‘145’ फत्ते, विश्वासदर्शक परीक्षेत पास

November 12, 2014 2:07 PM6 commentsViews:

Fadnavis12 नोव्हेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ‘आवाज कुणाचा’ दाखवत अखेर मिशन 145 फत्ते केले आहे. फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा आज पास केलीये. विधानसभेत अभुतपूर्व गोंधळात आवाजी मतदानाने भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकलाय. आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला आणि त्यावर अध्यक्षांनी आवाजी मतदान घेत लगेल मंजूरही दिली. त्यामुळे आता फडणवीस सरकार अधिकृतपणे सत्तेवर विराजमान झाले असून पुढील सहा महिने सरकार चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव सादर करायचा होता. सकाळच्या पहिल्या सत्रात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बागडे यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर विश्वासदर्शक ठराव सादर करण्याची घोषणा केली. अध्यक्षांच्या या घोषणेमुळे शिवसेना आणि काँग्रेसने एकच गोंधळ घातला. पण, या गोंधळातच आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव सादर केला. शिवसेनेनं मतविभाजनाची मागणी केली पण तीही अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यामुळे सेना आमदार आणखी संतापले. त्यातच अध्यक्षांनी शेलार यांच्या ठरावावर आवाजी मतदान घेऊन मंजुरीही देऊन टाकली आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. अध्यक्षांच्या मंजुरीनंतर आता फडणवीस सरकार सत्तेवर खर्‍या अर्थाने विराजमान झाले आहे. पुढील सहा महिने सरकारला काम करण्यास मुभा मिळाली आहे. पण भाजपला पाठिंबा कुणी दिला हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. राष्ट्रवादीने आपल्याला पाठिंबा दिला हे जाहीर होऊ नये यासाठी भाजपने आवाजी मतदानाची खेळी खेळली अशी चर्चा आहे. अध्यक्षांनी मतदान न घेता आवाजी मतदान घेऊन लोकशाहीचा खून केला अशी जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली. अध्यक्षांच्या कार्यपद्धतीविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तर अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी नियमबाह्य काम केलं, त्यांचा आम्ही धिक्कार करतो. नियमांप्रमाणे मतदान झालं पाहिजे होतं. पण तसं झालं नाही. तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडा असं जाहीर आव्हान सेनेचे नेते रामदास कदम यांनी दिलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Ravi Kesarkar

  प्रथम अभिनंदन फडणवीस+राष्ट्रवादी सरकारचे ! आवाजी मतादानाचा आधार घेत राष्ट्रवादी च्या जोरावर बहुमत सिद्ध केल्या बद्दल अभिनंदन ! निदान पुढील काही महिने तरी तुम्हाला आता बहुमत सिद्ध व अग्निपरीक्षा द्यावी लागणार नाही, परंतु तिथून पुढे पावलो पावली तुमची नेहमीच अग्नी परीक्षा व तारेवरची कसरत राहील, जे होणार ते चांगल्या करिता असे भगवत गीतेचा सार सांगतो, पण मला आता शंका येतेय , जे होणार ते चांगल्या करिता पण कोणाच्या राजकारण करणाऱ्या पक्षांच्या की या महाराष्ट्रातील जनतेच्या , मला वाटते जे भले होणार ते फक्त आणी फक्त राजकारणी लोकांचे जनतेचे नाही जनतेच्या भावनांचा खेळ मांडला तुम्ही सर्वांनी , असो निदान पुढील काही महिने तरी लोकांच्या कल्याण करिता राज्य चालवा व जे जे कोणी भ्रष्टा चारी आहेत त्यांना त्यांची जागा दाखवाल अशी आशा करतो नाहीतर कुटल्या तरी कमिटी व समित्या नेमून ते पुन्हा निर्दोष आहेत असे सांगू नका म्हणजे मिळवले , नाहीतर तुम्ही पाटीमागच्या सरकारचेच पाढे तुम्ही वाचले असे व्हायला नको !! तुमची आता नेहमीच कसोटी लागणार एक तर तुमच्या बरोबर धुर्थ आणी मात्बगार राजकारणी पवार साहेब आणी दुसऱ्या बाजूला इर्षेने पेटलेली शिवसेना मजबूत विरोधी पक्षाचे काम करणार यात काही शंका नाही, कितीही झाले तरी तुम्ही पवार साहेबांच्याच सावली खाली सरकार चालवू नका म्हणजे मिळवले , शेवटी सत्ताधारी आणी मजबूत विरोधक या माझ्या मावळ मातीतील जनतेला सुखाचे दिवस दाखवाल अशी आशा करतो !!

 • mrk

  He sarkar 14 mahinya chya var chalu shaknar nahi.

 • Pratik Sawant

  Hey Kasle Sale kasle Mantri.. MODI chya Talavar Nachnare he.. Himat nahi yanchyat Bahumat siddha karnyache.. LIVE IN RELATIONSHIP hota ata Lagna zala Farak etkach.. jya NCP var aroop kele udya tyachya mandela mande lavun basnar he loka..
  GUJRATI diwali kartel aaj parat ekda..
  –Aaj vaaet vat Marathi news channel yala pathemba detat– PAID NEWS — vekle gelat thumhe

 • mrk

  Pudhcya Hiwali adhiveshanat hya sarkar cha pathimba NCP kadhun gheil

 • Pravin

  aila…amhi amchya school election madhe pan itki cheating keli navti

 • दत्ता जाधव

  डेसिबल वर आलेले सरकार ,जर बहुमत सिद्ध करतेवेळी इव्हीममशीन वापरले असते तर ..भाजप ला २८८ इतकी मत मिळाली असती

close