हिंमत असेल तर पुन्हा ठराव मांडा -कदम

November 12, 2014 3:38 PM1 commentViews:

ramdas_kadam_new12 नोव्हेंबर : विधानसभेच्या अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी नियमबाह्य काम केलंय, त्याचा आम्ही धिक्कार करतोय. नियमांप्रमाणे मतदान झालं पाहिजे होतं. तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडून दाखवा ‘दूध का दूध पाणी का पाणी’ होऊ द्या असं थेट आव्हान शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला दिलंय.

आज विधानसभेत अभुतपूर्व गोंधळात फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. आवाजी मतदानाने भाजपने विश्वसादर्शक ठराव जिंकला खरा पण त्यावर शिवसेना आणि काँग्रेसने कडाडून विरोध केलाय. नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आवाजी मतदान घेऊन गोंधळात ठराव मंजूरही केला. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ठराव सादर केला तेव्हा सेनेनं मतदानांची मागणी केली होती. पण बागडे नव्यानेच अध्यक्षपदी बसल्यामुळे तेच गोंधळून गेले की, गांगरुन गेले माहिती नाही पण त्यांनी नियमबाह्य काम करुन ठराव मंजूर केला असा आरोप सेनेचे नेते रामदास कदम यांनी केला. अशा अध्यक्षांचा आम्ही धिक्कार करतो, जर तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडा. लोकांनाही कळू द्या तुमच्या बाजूने कोण आहे ?, तुम्ही कुणाचा पाठिंबा घेतलाय असं आव्हानही कदम यांनी फडणवीस यांना दिलं. नियमबाह्य काम करणार्‍या अध्यक्षांवरच विश्वासदर्शक ठराव मांडता येतो का हे ही आता पाहावं लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करणार आणि या सरकारला आता जरी संधी मिळाली असली तरी नागपूरच्या अधिवेशानात धारेवर धरणार असा इशाराही कदम यांनी दिला. तर सात वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं, अध्यक्षांनी ठरावाला मंजुरी देण्यासाठी बनाव केला असा गंभीर आरोप दिवाकर रावते यांनी केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vikrant Chavhan

    – आतापर्यंत शिवसेनेला सत्तेसाठी लाचार आणी स्वाभिमान नाही म्हणारे भडवे कुटे गेलेत? , आता सगळ्यांचा आवाज का बसलाय? आता महाराष्ट्राने पहिला ना स्वाभिमान आणी लाचारी कुणी कोणाची पत्करली ते ? सगळे काही दिवसापासून शिवसेनेला शिकवत होते , निट डोळे उघडे ठेऊन पाहा , कोणी लाचारी आणी स्वाभिमान कुणाकडे गहाण ठेवला आहे तो !!

  • Pingback: » आमच्या विरोधात शंका असल्यास अविश्वास प्रस्ताव आणावा -फडणवीस | IBN Lokmat Official Website

close