अभिनेते अतुल अभ्यंकर यांचं निधन

November 12, 2014 4:30 PM0 commentsViews:

abhay

12 नोव्हेंबर : ‘झी मराठी’ वरील ‘जय मल्हार’ या लोकप्रिय मालिकेतील प्रधानाची भूमिका साकारणार्‍या अभिनेते अतुल अभ्यंकर यांचं आज निधन झालं आहे.

आज पहाटे 3 च्या सुमारास मुलुंडच्या राहत्या घरात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणार्थ राहील, अशीच होती. अभ्यंकर यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एक सतत हसरा आणि लोकप्रिय चेहरा काळाच्या पडद्याआड गेल्याचं दु:ख त्यांच्या सहकारी कलाकारांनी व्यक्त केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close