राज्यपालांना धक्काबुक्की, काँग्रेसचे 5 आमदार 2 वर्षांसाठी निलंबित

November 12, 2014 6:39 PM1 commentViews:

congress_mla12 नोव्हेंबर :देवेंद्र फडणवीस सरकारनं आज (बुधवारी) विश्वासदर्शक ठराव जिंकला. पण या महत्त्वाचा दिवसाला वादाचं गालबोट लागलं. काँग्रेसच्या 12 आमदारांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याचं समोरं आलं. या प्रकरणी काँग्रेसच्या 5 आमदारांना 2 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, विरेंद्र जगताप, अमर काळे आणि जयकुमार गोरे यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आलीये. तसंच या प्रकरणी सखोल चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे.

राज्यपाल सी विद्यासागर राव यांचं दुपारी अभिभाषण होतं. पण शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना विधानभवन परिसरात त्यांची गाडी रोखली. यावेळी तिथं प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसच्या 12 आमदारांनी राज्यपालांना धक्काबुक्की केल्याचा आरोप एकनाथ खडसे केलाय.काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे, जयकुमार गोरे, अमर काळे, अब्दुल सत्तार आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी धक्काबुक्की केल्याचं खडसेंचं म्हणणं आहे. या बद्दलचं सीसीटीव्ही फूटेज आपल्याकडे आहे असा दावाही खडसेंनी केला. काँग्रेसच्या आमदारांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशाराही भाजपनं दिला होता. पण पहिल्याच अधिवेशनात कटुता येऊ नये यासाठी निलंबनाचा प्रस्ताव मांडू नये, अशी सूचना राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी केली. तर असा प्रकार झाला असल्याची कबुली देत काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली व्यक्त केली होती. पण सभागृहात एकनाथ खडसे यांनी निवदेन सादर केलं आणि धक्काबुक्की करणार्‍या आमदारांची नावं वाचून दाखवली. या प्रकरणाची दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या पाच आमदारांवर 2 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. तसंच या प्रकरणी सखोल चौकशी समितीही स्थापन करण्यात आलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close