भाजपला पाठिंब्याच्या मोबदल्यात, NCPला विधानपरिषदेच्या चाव्या?

November 12, 2014 8:52 PM2 commentsViews:

pawar_fadanvis12 नोव्हेंबर : राष्ट्रवादीची आजची भूमिका स्पष्ट न झाल्याने भाजप आणि राष्ट्रवादीत साटंलोटं असल्याचा आरोप आता होत आहे. भाजपला दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात विधानपरिषदेचं सभापतीपद आणि विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीला मिळू शकतं. त्यावेळी भाजप आडकाठी घेणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे.

भाजप सरकारने आज अग्निपरीक्षा पास केली. भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला पण भाजपला कुणाचा पाठिंबा मिळाला हे मात्र अजूनही अधिकृतपणे स्पष्ट झालं नाही. राष्ट्रवादीने अगोदर बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसंच आज विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सर्व आमदारांनी सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते पण कुणाच्या बाजूने मतदान करायचं हे सांगण्यात आलं नव्हतं. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव सादर केला आणि आवाजी मतदानाने तो मंजूरही झाला. पण भाजपने बहुमताचा 145 चा आकडा कसा पूर्ण केला हे अजूनही अनुत्तरीत आहे. सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, भाजपला दिलेल्या पाठिंब्याच्या बदल्यात विधानपरिषदेचं सभापतीपद आणि विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीला मिळू शकतं. त्यावेळी भाजप आडकाठी घेणार नाही असं कळतंय. पण राष्ट्रवादीकडून हा आरोप नाकारण्यात येतोय. नियमानुसारच राष्ट्रवादी विधान परिषदेच्या निवडणुकाला सामोरी जाईल, असं सांगण्यात येतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • satyadev

    विश्वास दर्शक ठराव मंजूर झाल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे उखाणे. १. द्या बाई द्या हाताना बळ, उमेदवार आमुचे छगन भुजबळ २. ह्यांच्या देशसेवेचा वसा जुना आहे फार, आमुचे उमेदवार अजित पवार. ३. स्वर्गात इंद्र, देश्यात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, गल्लीत जितेंद्र. ४. सर्वात महत्वाचा ह्यांना आहे देश, आमुचे उमेदवार नाईक गणेश ५. सर्व गुन्हेगारांचा द्या ह्यांना ताबा, हे तर आपुले आर आर आबा ६. ज्यांनी काही भ्रष्ट्राचार केले नाही बरे, आहे त्याचे नाव सुनील तटकरे ७. सत्तेत सामील होण्याची हिला नाही घाई, हि तर आपुल्या दादांची ताई ८. डोक्यावर ह्यांच्या कायम, सत्तेचा वरद, महाराष्ट्र अभिमान, आमुचा शरद ९. सर्व काही करून, हे असतात ऑल वेल, लक्षात ठेवा तुम्ही, प्रफुल पटेल १०. कॉंग्रेसच्या उमेदवारा, इथून आता पळ, आम्हाला मिळाले आहे, राष्ट्रवादी बळ ११. शिवसेनेची युती तोडून, दूर केले काटे, निघालो आम्ही आता, राष्ट्रवादीच्या वाटे.

  • Ravi Kesarkar

    आता भाजपाने पाठींबा च्या बदल्यात चाव्या दिल्या काय किंव्हा पूर्ण तिजोरी रिकामी करून दिली काय ? त्यात नवल ते काय ? नवल व्हायचे ते कालच संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे ! मला वाटते आता चाव्या- तिजोरीत लोकांना रस राहिला नाही.

close