बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती स्थिर

June 19, 2009 2:24 PM0 commentsViews: 1

19 जून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंी प्रकृती आता स्थिर आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तसंच श्‍वसनाच्या त्रासामुळे बाळासाहेबांना गुरुवारी रात्री लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बाळासाहेबांच्या तब्येतीबाबत चितेंचं कारण नाही, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तर मनोहर जोशी यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीबद्दल काळजी नको, असं स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी षणमुखानंद हॉलमध्ये शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

close