ठरावाच्या वेळी सेना नेते सभागृहात नव्हते -भुजबळ

November 12, 2014 11:10 PM2 commentsViews:

BHUJBAL ON MUNDE312 नोव्हेंबर : विधानसभेच्या सभागृहात जेव्हा विश्वासदर्शक ठराव मांडला गेला तेव्हा शिवसेनेचे आमदार सभागृहात नव्हते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केला. इतक्या महत्वाच्या ठरावाच्या वेळी सेना आमदार बाहेर ठरवू गेले की त्यांचा अनुभव कमी पडला असा टोलाही भुजबळांनी सेनेला लगावला. तर सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी भुजबळांच्या गौप्यस्फोटातून हवा काढत आपली कातडी वाचवण्यासाठी असे आरोप करताय असा पलटवार केला.

विधानसभेच्या सभागृहात विश्वासदर्शक ठरावावरुन चांगलेच नाट्य घडले. पण या नाट्याला राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी नवे वळण दिले. भुजबळ म्हणतात, ज्या वेळेला विश्वासदर्शक ठराव मांडला जातोय तेव्हा सेनेचे आमदार दुसर्‍या कारणावरुन बाहेर गेले होते. पण असं नेहमी होतं असतं. बाहेर गेल्याच्या नंतर कळतं की, महत्वाचा विषय राहुन गेला. मग सगळे जण धावत येतात आणि परत कामाला लागता. पण आज उलटंच घडलं. इतक्या महत्वाच्या प्रस्तावाच्या वेळी सेनेचे नेते बाहेर गेले होते. आता त्यांचा अनुभव कमी पडला की हे ठरवून केलं होतं की, चुकून घडलं आता हा संशोधनाचा विषय आहे असा टोला भुजबळांनी लगावला.

भुजबळांच्या या विधानाचा शिवसेनेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. आम्ही सभागृहातच होतो. दुसर्‍या क्रमांकावर विरोधीपक्षनेत्याचा प्रस्ताव मांडला जाणार होता. पण अध्यक्षांनी तो अगोदर घेतला. मी स्वत: त्याला विरोध केला आणि पोलची मागणी केली. पण गोंधळाच्या परिस्थिती निर्माण झाली आणि अध्यक्षांनी प्रस्ताव मंजूर केला. आम्ही पोल घेतला नाही म्हणून निषेध करून सभागृहातून बाहेर पडलो होतो. जर भुजबळांना असे वाटत असेल तर तेच आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी दुसर्‍यांवर आरोप करत आहे अशी विखारी टीका शिंदेंनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ravi Kesarkar

    इकडे तुम्ही बोलतायत विश्वास दर्शक ठराव मांडला तेंव्हा शिवसेना बाहेर होती तिकडे भाजपा वाले गळा बसे पर्यंत ओरडून सांगतायत की विश्वास दर्शक ठराव मंजूर झाल्या नंतर शिवसनेने मत विभाजनाची मागणी केली, मग मला सांगा शिवसेना बाहेर जाऊन परत आता आली का ?
    चोरांच्या उलट्या बोंबा !! तुम्ही फक्त खेळ मांडला आहे भुजबळ साहेब, जनता जनार्दन भोळे आहेत पण बे अक्कल नाहीत , ये लक्षात असू द्या ! तुमच्या शाब्दिक कोट्या तुमच्या पर्यंतच ठेवा, उगीचच आपली प्रतिमा का खराब करताय ? तसे पहिले तर तुमची प्रतिमा सामान्य जनतेत अस्वच्छ आहेच पण स्वच्छ आहे की नाही हे आपणास चांगलेच ठाऊक आहे.

  • Vivek Vaidya

    Bhujbal is senior MLA & certainly he is escalating reality no doubt

close