महिला आयोगाने केली शायनीच्या कठोर शिक्षेची मागणी

June 19, 2009 2:27 PM0 commentsViews: 1

19 जून अभिनेता शायनी आहुजा हा दोषी आढळल्यास त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा गिरीजा व्यास यांनी केली आहे. मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणाची दखल महिला आयोगाने घेतल्यामुळे शायनी अहुजा अडचणीत सापडला आहे. दरम्यान अभिनेता शायनी आहुजा याचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. शायनीला 2 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी आर्थररोड जेल मध्ये करण्यात आली आहे. मोलकरणीवर बलात्कार केल्याचा शायनी आहुजावर आरोप आहे. शायनीने बलात्कार केल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये सिद्ध झालं आहे.

close