मुलुंडमध्ये भाजपविरोधात शिवसेनेचा रास्तारोको

November 13, 2014 12:44 PM0 commentsViews:

Shivsena andolan

13  नोव्हेंबर :  विधीमंडळात काल (बुधवारी) जबरदस्तीने विश्वास दर्शक ठराव संमत केल्या प्रकरणाचा विरोध करण्यासाठी शिवसेना आज (गुरूवारी) सकाळी रस्त्यावर उतरून आक्रमक झालेली पाहायला मिळाली. मुलुंड चेकनाकाजवळ शिवसेनेच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात रस्ता अडवत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जवळपास अर्धा तास मिनिटे टोलनाक्याजवळील वाहतूकीच कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करुन आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करुन दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close