धूमकेतूवर उतरलं युरोपियन अंतराळयान!

November 13, 2014 1:29 PM0 commentsViews:

p6817_9715ca6b1e00b22d8160fb2d87471139philae

13  नोव्हेंबर : अंतराळ मोहिमांबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते, अंतराळ मोहिमांमध्ये आतापर्यंत चंद्रावर, मंगळावर यान उतरवण्यामध्ये वैज्ञानिकांना यश मिळालेलं आहे. पण आता एक नवीन इतिहास घडवलाय युरोपियन स्पेस एजन्सीने.  नासाच्या मदतीने त्यांनी चक्क एका धूमकेतूवर एक स्पेसक्राफ्ट उतरवलं आहे.  अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतं आहे.

फिली असं या अंतराळयानाचं नाव आहे. गेली 10 वर्ष तब्बल 4 अब्ज मैलांचा प्रवास करत हे यान पोहोचलेलं आहे. रोझेटा उपग्रहासोबत असणारं हे यान काल सकाळी उपग्रहापासून वेगळं करण्यात आलं आणि 7 तासांच्या फ्री फॉलनंतर हे यान धूमकेतूवर उतरलं. या फिली अंतराळयानाचा आकार आहे एखाद्या वॉशिंग मशीन एवढा आहे. पुढचं वर्षभर ते या धूमकेतूवरच राहणार आहे. त्यातून मिळणारी माहिती ही विश्वाच्या निर्मितीचं गूढ उकलण्यासाठी मदत करेल अशी आशा वैज्ञानिकांना आहे.

‘मॉम’नेही टिपला धूमकेतू
भारताच्या मंगळयानाने ’67 पी’ या धूमकेतूचे एक महिन्यापूवच् टिपलेले छायाचित्र ‘इस्रो’ने बुधवारी प्रसिद्ध केले. या धूमकेतूचे दर्शन मंगळयानाला 20 ऑक्टोबरला झाले होते. त्या वेळी ‘मॉम’ने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, ‘बापरे, लक्षात राहण्यासारखा अनुभव. धूमकेतूला अगदी जवळून वेगाने जाताना पाहिले. मी माझ्या कक्षेतच आहे, सुरक्षित आणि सुस्थितीत!तत मंगळयानाच्या कॅमेराने धूमकेतूच्या ‘कोमा’ या पृष्ठभागावरील प्रकाशमान भागाचे फोटो काढले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close