अभिनेत्री ममता कुलकर्णी केनियन पोलिसांच्या ताब्यात

November 13, 2014 2:23 PM1 commentViews:

Mamata Kulkarni

13  नोव्हेंबर :  बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज तस्करीप्रकरणी केनियन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्यासोबत तिचा नवरा विजय गोस्वामी उर्फ विकी गोस्वामीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

केनियातील ड्रगविरोधी एजन्सीने ड्रग्जची तस्करी करणार्‍या एक मोठा रॅकेट उघड केले आहे. याप्रकरणी ममता कुलकर्णी, तिचा पती विकी यांच्यासोबत इतर तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. विकी गोस्वामीसह इतर तिघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

करण अर्जुन, क्रांतीवीर, बाजी, आशिक आवारा यासारख्या चित्रपटांमधून अभिनय केलेल्या ममताने बॉलिवूडमध्ये चांगला जम बसविला होता. मात्र अचानकपणे ती बॉलिवूडपासून दूरावली होती.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vikrant Chavhan

    वाईट लोकांच्या संगतीत आल्या नंतर… चांगले सुद्धा भरकटले अथवा वाईट वागतात , या ममता कुलकर्णीच्या गोष्टीवरून भाजपा ने धडा घेणे जरुरीचे आहे !!

close