ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत यांचे निधन

November 13, 2014 2:45 PM0 commentsViews:

Chandrashekhar Sant_new13  नोव्हेंबर : ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने मुलुंड येथील राहत्या घरी निधन झाले. ते 61 वर्षांचे होते.

क्रीडा पत्रकारितेत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणारे संत हे सुरुवातीला अभ्युदय बँकेत नोकरीला होते. मात्र, त्या नोकरीत फार काळ त्यांचे मन रमले नाही. त्यानंतर ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रुजू झाले. ते अनेक वर्ष ‘महाराष्ट्र टाइम्स’चे क्रीडा संपादक म्हणून कार्यरत होते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं त्यांनी वार्तांकन केलं होतं. त्याचं बरोबर क्रीडासंस्थांच्या संघटनात्मक कामांमध्ये त्यांचं भरीव योगदान होतं. 1983सालच्या भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप विजयाचे वृत्तांकन करण्यासाठी त्यांनी इंग्लंड दौराही केला होता. चंद्रशेखर संत यांच्या निधनामुळे खेळांच्या प्रसारासाठी झटणारा एक हरहुन्नरी पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close