नाशिकमध्ये तडीपार गुंड विश्‍वनाथ कातारी एन्काऊंटरमध्ये ठार

June 19, 2009 2:39 PM0 commentsViews: 4

19 जून नाशिकमधला तडीपार गुंड विश्‍वनाथ कातारी पोलिसांसोबत झालेल्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला. पंचवटी परिसरातल्या तपोवन भागात हे एन्काऊंटर झालं. विश्‍वनाथ कातारी याला पोलीस अटक करण्यासाठी गेले असताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना विश्‍वनाथ कातोरे ठार झाला. त्याच्यासोबत असणा-या साथीदाराने तिथून पळून जाण्यात यश मिळवलं. ' कातारी आणि त्याच्या साथीदाराकडे फॅक्टरी मेड पिस्तुल होतं. अजून चार ते पाच गुंडांकडे अशी प्राणघातक हत्त्यारं आहेत. आम्ही त्यांचा कसून शोध घेत आहोत, अशी माहिती पोलीस नाशिकचे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांनी दिली आहे. कातारी हा कॉन्स्टेबल बिडवे हत्या प्रकरणातला आरोपी आहे. कातारी याचा मृतदेह नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलवर कातारीच्या नातेवाईकांनी दगडफेक केली.

close