उदयनराजे भडकतात तेव्हा…

November 13, 2014 7:30 PM3 commentsViews:

UDAYANRAJE_bhosle13 नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले नेहमी आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत राहतात. आता दर उदयनराजे यांनी आपले बंधू शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केलीय. मुसक्या बांधण्याची मजल आजही कुणात नाही आणि भविष्यात कुणात नसेल असं इशाराच भोसलेंनी दिला. तसंच दुसर्‍या घटनेत भोसले यांनी ‘नंतर बघून घेतो’ असा पोलिसांना दम भरलाय.

सातारा नगरपालिकेत नगर विकास आणि सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. असं असताना विधानसभेला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचं मताधिक्य घटलं. नगरसेवकांनी काम केलं नाही, त्यामुळेच मताधिक्य घटल्याची चर्चा सुरू झाली. माझे हात दगडाखाली सापडले आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका त्यावेळी शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर केली होती. त्याला उदयनराजेंनी त्यांच्या खास स्टाईलनं उत्तर दिलंय.आमच्या मुसक्या बांधण्याची मजल आजही कुणात नाही आणि भविष्यात कुणात नसेल असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिलाय. पत्रकारांशी बोलत असताना भोसले यांनी बोलण्याच्या ओघात टेबलवर ठेवले माईकही दूर सारले.

तर दुसरी घटना अशी की, सातारा शहरातल्या वाढत्या गुंडगिरी विरोधात उदयनराजे यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. मात्र, त्यांचं निवेदन घेण्यासाठी पोलीस प्रमुख खाली आलेच नाही. त्यामुळे चिडलेल्या उदयनराजेंनी बघून घेतो असा दम भरत उपोषण सोडून निघून गेले.

सातारा शहर परिसरात सध्या गुंडगिरी तसेच खंडणी मागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत वारंवार पोलिसांकडे याविषयी तक्रारी करून देखील पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप स्थानिक व्यावसायिक करीत आहेत या प्रकाराबाबत खासदार उदयनराजे
भोसले यांच्याकडे काही लेखी तक्रारी आल्या होत्या या अनुशंघाने आज खासदार उदयनराजे भोसले हे पोलीस मुख्यालयासमोर उपोषणाला बसले. दरम्यान, वाढत्या गुन्हेगारी च्या विरोधातील निवेदन घेऊन पाच लोकांसमवेत पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी खासदार उदयनराजे यांना कार्यालयात बोलवण्यात आले. परंतु पोलीस अधीक्षकांनी उपोषण स्थळावर येऊन निवेदन स्वीकारावं अशी मागणी खासदार महोदयांनी केली. अधीक्षकांचा ऑफिस बाहेर येण्यास नकार आल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या फिल्मी स्टाइलने उत्तर दिले ”पळ काढणार्‍यापैकी मी, नाही वातावरण दुषित करायचं नाही म्हणून मी जातोय असं म्हणत माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेऊ नका अस बोलून खासदार उदयनराजे त्या ठिकाणाहून निघून गेले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Adv Nachiket

  असं वाटतं की हे शिवाजी महाराजांचे नाही तर औरंगजेबाचे वंशज असावेत.
  राजे अहोअसं बोलणं शोभतं का तुम्हाला? जरा कमी पीत जा.

 • suresh

  asle nalayak lok … Shivaji maharaj nakki dukhi hot astil ashya vaunshajanna pahun.
  ya lokanna jail madhye takayla hava… he kai raje nait. Gundegiri banda kara. Tumhi janateche NAUKAR ahat he lakshat theva. Baitaad Udayan”Bhikari”

 • Adv Nachiket

  राजे… खाजे खा खाजे…

close