राष्ट्रवादीला विरोध कायम राहिल -पंकजा मुंडे

November 13, 2014 9:47 PM2 commentsViews:

Pankaja munde13 नोव्हेंबर : आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नाही तो त्यांनीच दिला. पण गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादीच्या विरोधात काम केलं. त्यांचे संस्कार माझ्यावर आहे. आता सत्तेत आल्यावरही आमची भूमिका तीच राहील, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. तसंच भ्रष्टाचार प्रकरणात कुणी दोषी असेल मग तो भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षातल्या व्यक्ती असेल तर त्यावर नक्की कारवाई करू, असंही पकंजा मुंडेंनी स्पष्ट केलं. त्या औरंगाबादमध्ये बोलत होत्या.

बुधवारी विधानसभेत भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला पण विश्वास मात्र गमावला अशी परिस्थिती निर्माण झालीये. भाजप सरकारला आता जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. पण आम्ही विश्वासदर्शक ठराव नियमांप्रमाणेच जिंकला, जर संशय असेल काँग्रेसने अविश्वास ठराव आणावा असा असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पण पहिल्यांदाच भाजपच्या इतर नेत्यांनी यावर भाष्य केलंय. गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचा सत्तासंघर्ष सर्वश्रूत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या गडाला खिंडार पाडण्याचं काम केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत आणलं होतं. असा इतिहास असतांना आज भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला. याच मुद्यावर पत्रकारांनी पंकजा मुंडे यांनी विचारले असता, गोपीनाथ मुंडे यांचा राष्ट्रवादीला जसा विरोध होता तसाच आपला विरोध राहील असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Rajaram Khanolkar

    जुन्या ज्ञानी विचारवंतांनी वास्तवात राहिला पाहिजे आणि तत्वांचा काथ्याकुट करणा थांबवला पाहिजे. भाजप आता बदलली आहे हे लक्षात घेतला पाहिजे आणि कालानुरूप बदलला पाहिजे. आता थंडा करके खायेंगे असा वाजपेयी सारख वागला तर सत्ता यायला अजून एक जन्म लागेल. आता सगळ्या मार्गांचा व्यावहारिक विचार करावा लागतो. शत्रूला हरवून उपयोग नाही तर शत्रूला संपवण्यात खरा विजय आहे. जग बदलला आहे. जे पक्ष हा मार्ग अवलंबणार नाहीत ते संपतील नामशेष होतील.

  • Rajshekhar

    आम्ही लाच मागितली नाही त्यांनीच ती दिली, म्हणून घ्यावीच लागली

close