सरकारचा लेट लतिफ कारभार, मुंबई मेट्रो-2 प्रकल्प रद्द

November 13, 2014 11:02 PM0 commentsViews:

Image img_237242_mumbaimetrorun_240x180.jpg13 नोव्हेंबर : मुंबईकारांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या मेट्रो-2 बद्दलचा सरकार आणि रिलायन्स इन्फ्रामधला करार परस्परांच्या सहमतीने रद्द करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून दिरंगाई झाल्याने चार वर्षांत काम रखडलं असा आरोप रिलायन्स इन्फ्राने केलाय.

एकीकडे फडणवीस सरकारने बहुमताची परीक्षा पास करून राज्याच्या कारभाराचा गाडा हाकण्यासाठी सज्ज झालीये. पण आघाडी सरकारच्या लेट लतिफ कारभारामुळे मेट्रो-2 सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प रद्द झालाय. 2009 साली रिलायन्स इन्फ्राला या प्रकल्पाचं कंत्राट दिलं होतं. 12 हजार कोटीचा हा प्रकल्प होता. त्यानंतर 21 जानेवारी 2010 मध्ये राज्य सरकार आणि रिलायन्स इन्फ्रामध्ये या प्रकल्पाच्या संदर्भातला करार करण्यात आला. चारकोप, वांद्रे, मानखुर्द या पट्‌ट्यात मेट्रो-2 धावणार आहे. हा करार रद्द झाल्यानं आता सरकार पुन्हा नव्याने निविदा मागवण्याचा विचार करणार असल्याचं कळतंय.

रिलायन्स इन्फ्राचा खुलासा

“महाराष्ट्र सरकार/मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथोरिटी (एमएमआरडीए)ने काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण न केल्यानं या प्रकल्पाला सुरुवात होऊ शकली नाही. चार वर्षांच्या काळात राज्य सरकारनं अनेक प्रयत्न करूनही या प्रकल्पाच्या मार्गातले अडथळे दूर झाले नाहीत.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close