H1N1चा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण

June 20, 2009 7:12 AM0 commentsViews: 7

20 जून महाराष्ट्रात H1N1 चा पहिला पेशंट सापडला आहे. मुंबईतल्या कस्तुरबा रूग्णालयात दाखल झालेल्या एका 36 वर्षीय पेशंटची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. हा पेशंट न्यू जर्सीतून आला होता. महाराष्ट्रात H1N1 चा पहिला रूग्ण सापडल्याने राज्यातल्या संशयित रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत H1N1 चे 47 रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आतापर्यंत जगभरातल्या H1N1च्या रुग्णांची संख्या 5 हजार 928 वर गेली आहे. 15 जूनपर्यंत जगातल्या 76 देशांमध्ये हा रोग पसरला होता. H1N1 मुळे आतापर्यंत 163 जणांचा मृत्यू झाला आहे. H1N1 चा विषाणू पसरू नये यासाठी 21 एअरपोर्टवर तपासणी पथकं तैनात आहेत. ही सर्व माहिती भारत सरकारने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूदकेली आहे.

close