काही लोकांकडून नेहरूंचा वारसा खोडण्याचा प्रयत्न -सोनिया गांधी

November 13, 2014 11:40 PM0 commentsViews:

13 नोव्हेंबर : काही शक्ती आणि काही लोकं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उदार भारताच्या पायावरच घाला घालण्याचा प्रयत्न करत असल्याची जळजळीत टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसने दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेसनं सर्वच पक्षांना आमंत्रण दिलं. पण, भाजपसोबतच एनडीएच्या कुठल्याच घटकपक्षाला आमंत्रण दिलेलं नाही. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. काही लोकांकडून नेहरूंचा वारसा खोडण्याचा प्रयत्न केला जात असे टीकास्त्र सोनिया गांधींनी भाजपवर डागले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close