राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्ररणी 5 आमदारांवर फौजदारी गुन्हा?

November 14, 2014 9:58 AM0 commentsViews:

congress_mla

14 नोव्हेंबर : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 5 निलंबित आमदारांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी (बुधवारी) देवेंद्र फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला पण या महत्त्वाचा दिवसाला वादाचं गालबोट लागलं. ते म्हणजे विधानसभेत प्रवेश करताना काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपालांना प्रवेश करण्यास मज्जाव करत काँग्रेसच्या 12 आमदारांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर या प्रकरणी काँग्रेसच्या 5 आमदारांना 2 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. काँग्रेसचेआमदार अब्दुल सत्तार, अमर काळे, राहुल बोंद्रे, जयकुमार गोरे आणि वीरेंद्र जगताप यांना 2 वर्षांसाठी निलंबित करण्यात आली होती. पण या प्रकाराबद्दल खुद्द राज्यपालांनी विधिमंडळाच्या सचिवांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली असून या पत्राच्या आधारे काँग्रेसच्या 5 आमदारांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close