ठराव जिंकला, पण नैतिकतेचे सोवळे सुटले – शिवसेना

November 14, 2014 10:26 AM0 commentsViews:

uddhav_on_bjp_6nov

14 नोव्हेंबर : भाजपने आवाज वाढवून ठराव जिंकला असला तरी त्यांचे नैतिकतेचे सोवळे सुटल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणारे भाजपचे सरकार म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू असल्याचा टोला लगावला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला मनोरुग्णालयात नेण्याची वेळ राष्ट्रवादीमुळेच आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी जे पाप करत आहेत, तेच पाप शेवटी फडणवीस सरकारनं केले आहे. सरकारच्या या खेळीने महाराष्ट्राच्या इभ्रतीचा बळी गेला. भाजपने आवाज वाढवून ठराव तर जिंकला पण सरकारच्या नैतिकतेचे सोवळे सुटले, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. अवघ्या 24 तासांमध्ये शरद पवारांच्या फुल पॅण्टची हाफ चड्डी झाली आणि भाजपाच्या डोक्यावरही चांद-तार्‍यांची टोपी आली असा सणसणीत टोलाही त्यांनी राष्ट्रवादी आणि भाजपला लगावला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विधानसभेत जे झाले त्याचा राज्यभरात धिक्कार होत असून संस्था किंवा त्याच्या पद्धतीपासून दूर गेल्यास जनताच धडा शिकवेल असा इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close