शरद पवारांनी हाती घेतला झाडू

November 14, 2014 11:18 AM0 commentsViews:

Sharad pawar sweeping

14  नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता झाडू हाती घेऊन मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाला हातभार लावला आहे. शरद पवार यांनी सहपरिवार स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत शुक्रवारी बारामतीमध्ये साफसफाई केली. शरद पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वच्छता केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार तसेच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी रस्त्यावर साफसफाई केली.

इतकेच नव्हे तर, बारामतीच्या शेजारीच असलेल्या मूर्टीया गावात लवकरच पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ होणार आहे. राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सर्वांनी गाव स्वच्छ करण्यासाठी ‘श्रमदान’ करावं असं आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं. तर डेंग्युमुळे बारामतीत 2 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हे स्वच्छता अभियान राबवण्यात येतं असल्याचं असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आजपासून मुंबईसह राज्यात आठ दिवसांसाठी स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. त्यासाठी मुंबईत स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात झाडू घेऊन, रस्ता साफ करुन स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close