मागासवर्गीयांसाठी राज्यात 1 लाख तर मुंबईत 17 हजार घरं – चंद्रकांत हंडोरे

June 20, 2009 9:42 AM0 commentsViews: 12

20 जून मागासवर्गीयांसाठी राज्यात 1 लाख मुंबईत 17 हजार घरं बांधण्याची विशेष योजना सामाजिक न्याय विभागाने हाती घेतली असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी दिली आहे. सामाजिक न्यायविभागच्या घरकुल योजना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आयबीएन लोकमतशी ते बोलत होते. ' घरकुल योजना ही खास राज्यातल्या दलित बांधवांसाठी आसणार आहे. महाराष्ट्रातले ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र तसंच पालिका क्षेत्रांमध्ये ज्या दलित बांधवांची परिस्थिती अत्यंत बेताची आहे त्यांच्यासाठी ही खास योजना असल्याचंही चंद्रकांत हांडोरे यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 1 लाखांपर्यंत उत्पन्न असणा-यांसाठी 90 टक्के अनुदान देऊन 1 लाख रूपयांपर्यंतची घरं बांधण्यात येणार आहेत. तर मुंबईत 2 लाखापर्यंतची घरं 90 टक्के अनुदानातून सरकार मागासवर्गीयांना देणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. सामाजिक न्यायविभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पाहता काँग्रेसची जोरदार निवडणुक तयारी सुरू झाली असल्याचा अंदाज येत आहे. एमएमआरडीए अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

close