सरकारने आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी -चव्हाण

November 14, 2014 7:12 PM0 commentsViews:

cm on ncp 3314 नोव्हेंबर : मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे तत्कालिन आघाडी सरकार एकच धक्का बसलाय. पण काँग्रेसच्या नेत्यांनी अपयशाचा खापरं नव्या सरकारवर फोडलं आहे. नव्या सरकारने मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

तसंच अंतिम निर्णयाच्या वेळी कोर्टात पूर्ण ताकदीने बाजू मांडली पाहिजे आणि हा निर्णय मान्य करुन घेतला पाहिजे असा सल्लाही चव्हाणांनी दिला. चव्हाण पुढे म्हणतात, आरक्षणाला स्थगिती मिळाली हे धक्कादायक आहे. आम्ही पूर्ण विचार करून मराठा आरक्षणाला मंजुरी दिली होती. कोर्टात जेव्हा आव्हान देण्यात आले तेव्हा आम्ही पूर्ण तयारी केली होती. पण, नवे सरकार कुठे तरी कमी पडले. त्यामुळे आता नव्या सरकारने आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीच चव्हाणांनी केली. तर सरकारनं आरक्षणाचा निर्णय कायम राहाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर नवे सरकार कोर्टात गेले नाहीतर आम्हीच सुप्रीम कोर्टात घेऊ असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close