प्रेमविवाहाला साक्षीदार झालात म्हणून दोघांना विवस्त्र करून मारहाण

November 14, 2014 9:27 PM6 commentsViews:

belgum_marhan14 नोव्हेंबर : प्रेमविवाहाला साक्षीदार म्हणून सही केल्यामुळे बेळगावजवळ बेळगुंदी गावात भाजपचे आमदार संजय पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी दोन तरुणांना कपडे काढून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय पाटील यांचे समर्थक संजय घाटगेसह सहा जणांना अटक करण्यात आलीये.

बेळगाव ग्रामीणचे भाजपचे आमदार संजय पाटील यांचे खंदे समर्थक सुरेश घाटगे यांच्या भावाच्या मुलीचा त्याच गावातून एका तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. मात्र या प्रेमविवाहाला मुलीच्या घरच्यांकडून प्रखर विरोध होता. परंतु या प्रेमविवाहाच्या वेळी या दोन तरुणांनी सह्या केल्या होत्या. याचाच राग धरुन 3 नोव्हेंबर रोजी संजय पाटील आणि सुरेश घाटगे यांनी या दोन्ही तरुणांना पकडून एका रूममध्ये डांबले. दोन्हीही तरुणांना विवस्त्र करून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यातल्या एकाचं नाव अनिल नागरदाळे असं आहे. सुरेश घाटगे हासुद्धा चंदगडचाच आहे. घाटगे आणि त्याच्या समर्थकांनीच मोबाईलवर या दोन्ही तरुणांकडून पुन्हा असं करणार नाही असं कबुल करुन घेतलं आणि त्यांनंतर बेदम मारहाण केली. मात्र मोबाईलचे फुटेज लिक झाल्यामुळे हा सगळाप्रकार समोर आला.
पण कर्नाटक पोलीस आमदारांच्या दबावामुळे कारवाई करायला टाळाटाळ करत होते. आता काकटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करण्यात दाखल आलाय. याप्रकरणी सुरेश घाटगे याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Amol Kale

  shame BJP

 • sagar patil

  khupach santap janak ghatana ahe..hya goshticha amhi dhikkar karto

 • Nishant Singh

  The guy who is hitting them should be hanged till death. Who is he to beat them like anything. A true shame on display.

 • P.U

  modi u n acche din sucks.

 • vaghesh salunkhe

  भाजपाची सत्ता आल्यावर सत्ता भोगणारांना आला नाही तितका माज त्यांच्या कार्यकर्त्यांना आला आहे.

 • KIRAN VANJARE

  he as jhal ki tumach vajan asha thikani dakhvnar tikde manus kami padel

close