मोदींच्या आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सोनियांनी घेतलं गावं दत्तक

November 14, 2014 11:25 PM0 commentsViews:

32sonia_on_modi14 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाडकी योजना असलेल्या आदर्श ग्राम योजनेअंतर्गत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधल्या जगतपूर भागातल्या उर्वा हे गाव दत्तक घेतलंय. तर उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीमधलं जगदीशपूर हे गाव दत्तक घेतलंय. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गावं दत्तक घेणं म्हणजे मोदींच्या योजनेला पाठिंबा देणं असा होत नाही असा बचावात्मक पवित्रा घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदर्श ग्राम योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला टप्प्याटप्प्याने तीन गावं दत्तक घ्यायची आहे. त्या गावांचा 2016 पर्यंत पूर्ण विकास करायचाय असा फर्मानच मोदींनी काढला आहे. खुद्ध मोदी यांनी मागिल आठवड्यात वाराणसी मतदारासंघातील जयापूर हे गाव दत्तक घेतले आहे. विशेष म्हणजे राजकारणात एकमेकांचे हाडवैरी असलेले दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी या योजनेच्या माध्यमातून एकत्र पाऊल टाकले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close