सातारा मतदारसंघात हस्तक्षेप करू नका : उदयन राजेंचा अजित पवारांना इशारा

June 20, 2009 12:50 PM0 commentsViews: 154

20 जून सातारा मतदारसंघात अजित पवारांना हस्तक्षेप करू देणार नाही असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. ते सातार्‍यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 15 व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सातार्‍यात आलेल्या अपयशाचं खापर अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्या माथ्यावर फोडलं होतं. त्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अजित पवारांनी आपल्या पुणे मतदारसंघाकडं लक्ष द्यावं, असा सल्ला त्यांनी त्यावेळी दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करून राजीनामे द्यावेत, असं परखड मत उदयनराजे यांनी नुकतंच मुंबईमध्ये व्यक्ते केलं होतं. उदयन राजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सातार्‍याचे खासदार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या शेकडो समर्थकांनी राष्ट्रवादीच्या लोकसभा विश्लेषण अहवालाची शनिवारी होळी केली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल खासदार उदयनराजेंना या अहवालात जबाबदार धरण्यात आलं होतं. त्यामुळे खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांत नाराजी होती. अहवाल जाळून कार्यकर्त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. अहवाल जाळून उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनाही इशारा दिला.

close