शासकीय नियम बाजूला ठेऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या -शिंदे

November 15, 2014 1:47 PM0 commentsViews:

eknath shinde23415 नोव्हेंबर : राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालंय, बळीराजा हवालदिल झाला आहे. यामुळे सर्व शासकीय नियम बाजूला ठेऊन शासनाने या सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश त्वरीत द्यावेत अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 8 आमदार मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागांचा पाहणी दौर्‍यावर आहेत. आज सकाळी 6 वाजता मुंबईहून हे आमदारांचं पथक औरंगाबाद विमानतळावर दाखल झालं. हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यांतल्या दुष्काळग्रस्त गावांना हे पथक भेट देणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यात पारडी आणि अनखळीवाडी या गावातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबालाही ते भेटणार आहेत. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील गणपूर आणि खुदडा या गावातल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांनाही ते भेटणार आहेत. रात्री हे पथक परत मुंबईत परतणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close