माऊलींची पालखी सासवड मुक्कामी

June 20, 2009 1:22 PM0 commentsViews: 124

20 जून दिवेघाटाची सत्त्वपरीक्षा पार केल्यानंतर पाचव्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला मुक्कामी आहे. या ठिकाणी महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी ती जेजुरीकडे रवाना होईल. महत्त्वाचा सोहळा म्हणजे सोपानदेवांच्या पालखीचं सासवडहून प्रस्थान होणार आहे. अवघड समजला जाणारा दिवेघाट पार करुन माऊलींची पालखी आता सासवड मुक्कामी पोहोचली आहे. माऊलींच्या पालखी मार्गातला एक महत्वपूर्ण सोहळाशनिवारी पार पडणार आहे. वारकर्‍यांनाही एका आनंदाच्या क्षणाचा अनुभव घेता येणार आहे.अनावर ओढीने उन्हा-पावसातही वारकरी पंढरीची वाट आनंदानं चालत असतात. पण शुक्रवारी वाटेवरच्या अवघड दिवेघाटाने वारकर्‍यांची सत्तवपरीक्षाच पाहिली. शिंदे छत्री, हडपसर, उरुळी देवाची, वडकी नाला इथे पालखी सोहळा विसाव्यासाठी थांबला. आणि दुपारी 4 वाजता माऊलींच्या पालखीने दिवेघाट चढायला सुरुवात केली. त्याचवेळी माऊलींच्या स्वागतासाठी वरुणराजानेही हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाचा हलकासा शिडकावा आणि थंड वार्‍याच्या झुळुकांनी वारकरी रोमांचित झाले. आणि माऊली, माऊलीच्या जयघोषाने दवेघाट दुमदुमून गेला. घाट पार करण्यासाठी माऊलींच्या रथाला 7 बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. त्यानंतर पालखी सासवड मुक्कामी पोहोचली.

close