तब्बल 12 वर्षांनंतर एका महिलेची अंधारकोठडीतून सुटका

November 15, 2014 7:16 PM0 commentsViews:

akola_woman15 नोव्हेंबर : तब्बल 12 वर्षं एका अंधारकोठडीत असलेल्या एका महिलेची राज्य महिला आयोगाने सुटका केलीय. अकोला एमआयडीसीमधल्या एका गोडाऊनमध्ये महिलेला डांबून ठेवण्यात आलं होतं. महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर हा क्रूर खेळ थांबला. या महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अकोल्यातील एमआयडीसीमध्ये अब्दुल मोबिन अन्सारी यांच्या मालकीच्या गोडाऊनमधल्या एका छोट्याश्या खोलीत महिलेला डांबून ठेवण्यात आलं होतं. एका लहानश्या खिडकीतून तिला अन्न-पाणी दिलं जायचं..तब्बल 12 वर्षं या महिलेशी हा क्रूर प्रकार सुरू होता. राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ.आशा मिरगे यांना याबाबतची माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने या महिलेची सुटका केली. सतत 12 वर्षं डांबून ठेवल्यानं महिलेचं मानसिक संतुलन बिघडलंय. या महिलेला 12 वर्षं एकाच ठिकाणी का डांबण्यात आलं होतं. आणि इतक्या वर्षांत तिच्या घरच्यांनीही तिच्याकडे का दुर्लक्ष केलं, हा प्रश्न आहे. तिच्यावर उपचार झाल्यानंतरच तिच्यावरच्या अन्यायाची खरी कहाणी पुढे येईल. अब्दुल अन्सारी हा या महिलेवर लैंगिक अत्याचार करत असल्याचाही आरोप महिलेच्या आईनं केलाय. अब्दुल अन्सारीचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close