मुंबईत आढळला H1N1चा दुसरा रुग्ण

June 22, 2009 6:57 AM0 commentsViews: 2

22 जून मुंबईमध्ये H1N1 ची लागण झालेला दुसरा रुग्ण आढळला आहे. ऑस्ट्रेलियावरून परतलेल्या तरुणीला H1N1ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्या तरुणीला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्या तरुणीचा पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरालॉजीचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता मुंबई H1N1 च्या पेशंटची संख्या दोन झाली आहे. या आधी 20 जूनला न्यूजर्सीतून मुंबईत आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीला H1N1 ची लागण झाली होती. त्याच्यावरही कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

close