सेना- भाजपच्या युतीसाठी संघ मध्यस्थी करण्याचे संकेत

November 16, 2014 12:35 PM3 commentsViews:

Uddhav and mohan bhagwat

16 नोव्हेंबर : भाजपने शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सत्ता स्थापनेत शिवसेनेसोबतची चर्चा फिसकटल्यावर भाजपने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवण्यास संघातून तसंच भाजपमध्यूनही मोठी प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठ्या मनाने पुन्हा सोबत घ्यावं, यासाठी भाजपवर दबाव वाढू लागला आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र यावी, यासाठी खुद्द सरसंघचालक मोहन भागवत प्रयत्नशील असल्याचं कळतं. तर दुसरीकडे शिवसेनेतील अनेक आमदारही सत्तेत सहभागी होण्यासाठी तयार आहेत.  याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना – भाजपमध्ये पुन्हा युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे समजते. यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि भागवत यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातल्या राजकीय स्थितीवर त्यांच्यात यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीने आपल्याशिवाय भाजपला पर्याय नसल्याचं वातावरण निर्माण केल्याने पक्षात मोठी नाराजी आहे. त्यामुळे  भाजप – शिवसेनेमध्ये पुन्हा युती होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सरसंघचालकांची मध्यस्थी कितपत यशस्वी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sanjay Kale Patil

  2 Hindu party aktra yavet yachi purn Hindustan vat pahat ahe

 • satyadev

  NCP ची मदत घेवून विश्वास दर्शक ठराव मंजूर झाल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नवे उखाणे घ्यावे लागतील.

  १. द्या बाई द्या, हाताना बळ, उमेदवार आमुचे, छगन भुजबळ.

  २. ह्यांच्या देशसेवेचा वसा जुना आहे फार, आमुचे उमेदवार अजित पवार.

  ३. स्वर्गात इंद्र, देश्यात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, गल्लीत जितेंद्र.

  ४. सर्वात महत्वाचा ह्यांना आहे देश, आमुचे उमेदवार नाईक गणेश.

  ५. सर्व गुन्हेगारांचा द्या ह्यांना ताबा, हे तर आपुले आर आर आबा .

  ६. ज्यांनी काही भ्रष्ट्राचार केले नाही बरे, आहे त्याचे नाव सुनील तटकरे .

  ७. सत्तेत सामील होण्याची हिला नाही घाई, हि तर आपुल्या दादांची ताई .

  ८. डोक्यावर ह्यांच्या कायम, सत्तेचा वरद, महाराष्ट्र अभिमान, आमुचा शरद .

  ९. सर्व काही करून, हे असतात ऑल वेल, लक्षात ठेवा तुम्ही, प्रफुल पटेल.

  १०. कॉंग्रेसच्या उमेदवारा, इथून आता पळ, आम्हाला मिळाले आहे, राष्ट्रवादी बळ .

  ११. शिवसेनेची युती तोडून, दूर केले काटे, निघालो आम्ही आता, राष्ट्रवादीच्या वाटे.

 • satyadev

  NCP ची मदत घेवून विश्वास दर्शक ठराव मंजूर झाल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नवे उखाणे घ्यावे लागतील.

  १. द्या बाई द्या, हाताना बळ, उमेदवार आमुचे, छगन भुजबळ.

  २. ह्यांच्या देशसेवेचा वसा जुना आहे फार, आमुचे उमेदवार अजित पवार.

  ३. स्वर्गात इंद्र, देश्यात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, गल्लीत जितेंद्र.

  ४. सर्वात महत्वाचा ह्यांना आहे देश, आमुचे उमेदवार नाईक गणेश

  ५. सर्व गुन्हेगारांचा द्या ह्यांना ताबा, हे तर आपुले आर आर आबा

  ६. ज्यांनी काही भ्रष्ट्राचार केले नाही बरे, आहे त्याचे नाव सुनील तटकरे

  ७. सत्तेत सामील होण्याची हिला नाही घाई, हि तर आपुल्या दादांची ताई

  ८. डोक्यावर ह्यांच्या कायम, सत्तेचा वरद, महाराष्ट्र अभिमान, आमुचा शरद

  ९. सर्व काही करून, हे असतात ऑल वेल, लक्षात ठेवा तुम्ही, प्रफुल पटेल

  १०. कॉंग्रेसच्या उमेदवारा, इथून आता पळ, आम्हाला मिळाले आहे, राष्ट्रवादी बळ

  ११. शिवसेनेची युती तोडून, दूर केले काटे, निघालो आम्ही आता, राष्ट्रवादीच्या वाटे.

close