पुणे- सातारा हायवेवर भीषण अपघात, 8 जण ठार

November 16, 2014 5:24 PM0 commentsViews:

satara accident

16 नोव्हेंबर :  सातारा तालुक्यातील पारगाव खंडाळा येथे भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून झालेल्या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात आणखी चार जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पारगाव खंडाळा येथील एका उतारावर काही प्रवासी एसटी बसची वाट बघत होते. तिथे आधीच एक बस येऊन थांबली होती. या दरम्यान साखरेनी भरलेला राधेश्याम कंपनीचा एक कंटेनर भरधाव वेगात त्या दिशेने आला. बस बघून चालनानी कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला, पण वेग खूप असल्यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि हा कंटेनर बसची वाट बघणार्‍या प्रवाशांवर जाऊन उलटला. यात सुमारे प्रवासी कंटेनरखाली चिरडले गेले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू झाले आहे.

पारगाव खंडाळा गावाजवळ मुंबई आणि पुण्याकडे जाणार्‍या बसेस थांबत नाहीत. त्यामुळे गावकर्‍यांना अशा ठिकाणी येऊन थांबाव लागतं. या ठिकाणी असा भीषण अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे. दरम्यान, शासनाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसदारांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close