चायना ओपन सुपर सीरिजमध्ये भारताचा डबल धमाका!

November 16, 2014 7:44 PM0 commentsViews:

saina and shrikant

16  नोव्हेंबर : चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेतमध्ये भारतासाठी आजचा संडे ‘सुपर संडे’ ठरला आहे. चीन ओपन सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर सायनाने आपलं नाव कोरलं आहे. तर सायनाच्या पाठोपाठ ऑलिम्पिक चॅम्पियन लिन डॅनचा पराभव करत पुरुष एकेरीत स्पर्धेत भारताच्या के. श्रीकांतनेही विजेतेपेद पटकावलं आहे.

सायनाने फायनल राऊंडमध्ये जपानच्या अकेन यामागुचीचा 21-12, 22-20 असा पराभव करत पहिल्यांदाच सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावलं आहे. सायनाने फायनल राऊंड फक्त 42 मिनिटांत जिंकली आहे.  तर  श्रीकांतने हा सामना २१-१९, २१-१७ असा खिशात घातला. श्रीकांतने कारकीर्दीतील हे पहिलेच सुपर सीरीज जेतेपद आहे.

चायना ओपन जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. चायना ओपनसह सायनानं वर्षातलं दुसरं सुपर सीरिज जेतेपद मिळवलं आहे. याआधी सायनानं मे महिन्यात ऑस्ट्रेलियन सुपर सीरिजचं जेतेपद मिळवलं होतं. सायनानं वर्षाच्या सुरुवातीला सय्यद मोदी इंडियन ओपन ग्रां-प्री जिंकण्याचाही पराक्रम गाजवला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close