पाकिस्तान बनला टी-20चा विश्‍वविजेता

June 22, 2009 7:36 AM0 commentsViews: 1

22 जून लॉर्ड्सवर रंगलेल्या टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पाकिस्तानने श्रीलंकेचा 8 विकेट राखून पराभव केला आणि विश्‍वविजेतेपदाचा बहुमान पटकावला. पाकिस्तानच्या भेदक बॉलिंगसमोर श्रीलंकेची बलाढ्य बॅटिंग निष्फळ ठरली. मोहम्मद आमिरने दिलशानला आऊट करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला तर रझ्झाकने तीन विकेट घेत लंकेच्या बॅटिंगमधली हवाच काढून टाकली. श्रीलंकेने पाकिस्तानपुढे विजयासाठी 139 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करताना पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली. त्या आक्रमक सुरुवातीनंतर जयसूर्याने पाकिस्तानच्या बॅटिंगला ब्रेक लावला. जयसूर्याने तुफान फटकेबाजी करणार्‍या कामरान अकमलला 37 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तर मुरलीधरनने शाहझेब हसनला 19 रन्सवर आऊट केलं. पण नंतर शाहीद आफ्रिदीने नाबाद 54 रन्स करीत टीमला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. याअगोदर श्रीलंकेने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. पण कॅप्टन संगकाराचा हा निर्णय टीमला चांगलाच महागात पडला. पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांचा स्टार बॅटसमन दिलशान भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्य परतला. आणि त्यानंतर ठरवीक अंतराने श्रीलंकेच्या विकेट पडत गेल्या. अखेर कॅप्टन संगकाराने श्रीलंकेची इनिंग सावरली. त्याने शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. संगकाराच्या या खेळीमुळेच श्रीलंकेला शंभरचा टप्पा पार करता आला. पाकिस्तानला एकहाती विजय मिळवून देणारा शाहीद आफ्रिदी मॅन ऑफ द मॅच ठरला तर दिलशानची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. दरम्यान यंदाच्या टी-20 वर्ल्डकप फायनलनंतर लगेचच पाकिस्तानचा कॅप्टन युनूस खान याने टी-20 मधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. वकार युनूसने स्पर्धा संपल्यांनंतर लगेचच हा निर्णय जाहीर केला आहे. मात्र वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये युनूस खान खेळणार आहे.

close