‘निर्णय उद्धव ठाकरेच घेतील’

November 16, 2014 8:14 PM0 commentsViews:

 16 नोव्हेंबर : केंद्रात भाजपसोबत रहायचं की नाही, याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असं केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी म्हटलं आहे.

राज्यात जरी आम्ही विरोधी पक्षात असलो तरी लोकसभेच्या निवडणूका शिवसेना आणि भाजपने NDA म्हणून एकत्रच लढवल्या आहेत. त्यामुळे केंद्रातील शिवसेनेची भुमिका ही वेगळी आहे. मात्र यासंदर्भातील अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दिलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close