शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दुसरा स्मृतिदिन!

November 17, 2014 8:22 AM1 commentViews:

Balasaheb

17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (सोमवारी) द्वितीय स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थावर दाखल होत आहेत.

द्वितीय स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून स्मृतिस्थळावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसैनिकांसोबत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्मृतिस्थळाला भेट देऊन सहकुटुंब आदरांजली वाहिली.

शिवसेनेचे नेते अनिल देसाई, दिवाकर रावते, मनोहर जोशी निलम गोर्‍हे यांनीही स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. त्याशिवाय आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. भाजपच्या नेत्यांनी मात्र केलं बाळासाहेबांचं ट्विटरवरूनचं आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या कार्यक्रमांच्या यादीमध्ये शिवाजी पार्कच्या भेटीचा उल्लेख नाही आहे. तर राज ठाकरेही थोड्याच वेळात पुण्याला जायला निघणार आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Ravi Kesarkar

  “झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा”

  मला वाटते , छत्रपती शिवाजी महाराज नंतर तमाम मराठी मनामध्ये अढळ स्थान मिळवलेला असा हा निखारा आज आपल्यात नाही आहे याच्यावर विश्वासच बसत नाही आहे .. शेवटा पर्यंत मराठी माणसासाठी जीवाचे रान करणारा आणि आईच्या प्रेमाने वात्सल्य देणारा हा बाप माणूस , खरच शब्दाच्या पलीकडचा होता. शेवट पर्यंत इमान जपायला सांगणारा आणि एकच इच्छा मराठी माणूस मराठी माणसाच्या वीरोधात उभा राहता कामा नये , अशी सुप्त आणि रास्त भूमिका मांडणारा असा हा दुरद्र्ष्टी असलेला समस्त हिंदू आणि मराठी मनाचा सर्वोच असा हा विठोबा राजा आज संपूर्ण महाराष्ट्रला पोरखं करून परतून न येण्याचा वाटेवर निघून गेलाय. प्रबोधनकारांना अभिमानाने सांगावसे वाटते, दादा तुम्ही महाराष्ट्राला अर्पण केलेला असा हा बाळ, शेवटा पर्यंत महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी ढाण्या वाघ बनून लढत राहिला. अशा या ढाण्या वाघाला माझा आणि समस्त मराठी मनाचा त्रिवार मुजरा …! कुटलीही राजकीय अभिलाषा न बाळगणारा, जशास तसे वागणारा , महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी काय पण ……करणारा असा हा तारा कधी न जाहला …आणि पुढे न होणार …! साहेब संपूर्ण महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील ….ज्या शिवाजी पार्क मध्ये शिवसेनेचा जन्म झाला, ज्या शिवाजी पार्क मध्ये प्रबोधनकारांनि बाळ महाराष्ट्रला अर्पण केला , जो शिवाजी पार्क गेले पाच दशके बाळासाहेब यांची खणखणीत हाक आणि सडेतोड विचार निशब्द पणे नेहमी ऐकत होता तोच आज बाळासाहेब यांना आपल्या उराशी आणि ह्रदयात सामावून पुन: एकदा निशब्द उभा आहे ….शिवाजी महाराज यांच्या नंतर ऐवढ प्रेम आणि समस्त मराठी माणसांवर आणि त्यांच्या ह्रदयावर आपल्या विचारांचे आणि आचारांचे गारुड घालणारा असा हा गारुडी गेले ५ दशके सतत निखारा म्हणून धगधगत होता अशा या गारुड्याला माझा त्रिवार जय महाराष्ट्र !!

  धगधगत्या अग्नीचा निखार तू…!! सकळ मराठी मनाचा हुंकार तू…!!

  महाराष्ट्राचे दैवत, सरसेनापती, हिंदह्रदय सम्राट , आदरणीय शिवसेना प्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे यांना द्वितीय स्मृतीदिन निमित्त भावपूर्ण आदरांजली !!

  जगदंब !! जगदंब !! जगदंब!!

close