‘मुख्यमंत्री चले जाव’, शिवाजीपार्कवर शिवसैनिकांची घोषणाबाजी

November 17, 2014 4:08 PM0 commentsViews:

uddhav_fadanvis17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून स्वागत केलं. ‘मुख्यमंत्री चले जाव’ अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी भाजपवरचा रोष व्यक्त केला. पण बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं स्मारक उभारणार अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने शिवाजीपार्कवर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी एकच गर्दी केली आहेत. शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि त्यांनंतर सत्ता सहभागावरुन झालेल्या वादामुळे भाजपचे नेते शिवाजी पार्कवर जाणार की नाही यावरुन सस्पेंन्स कायम होता. अखेरीस दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, वैद्यकीय-उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, खाण-उद्योग मंत्री प्रकाश मेहता आणि विद्या ठाकूर यांनी शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांचं आगमन होताच शिवसैनिकांनी ‘मुख्यमंत्री चले जाव’च्या घोषणा दिल्यात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांची भेट घेऊन काही मिनिटांत काढता पाय घ्यावा लागला. यावेळी मीडियाशी बोलतांना बाळासाहेबांबाबत नितांत आदर आहे. ते आमच्यासाठी पितृतुल्य होते. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणार आणि साजेशी स्मारक उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close