मुंबईवरच्या कोणत्याही संकटाला सामोरं जाणार – डी. शिवानंद

June 22, 2009 3:18 PM0 commentsViews: 5

22 जून मुंबईवरील कोणत्याही हल्ल्याला तोंड द्यायला आपण सज्ज आहोत असं पोलीस आयुक्त डी. शिवानंद यांनी म्हटलं आहे. मुंबईवर हवाई हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी विचारण्यात आलं होतं. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं डी. शिवानंद यांनी म्हंटलं आहे. मुंबईवर कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्याची शक्यता नसल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्री जयंत पाटील यांनीही दिलं आहे. सोमवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत मुंबई पोलिसांना हवाई गस्तीसाठी हेलिकॉप्टर देण्यात यावीत अशी मागणी डी. शिवानंद यांनी केली होती.

close