डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीची शक्यता

June 22, 2009 3:21 PM0 commentsViews: 2

22 जून केंद्र सरकार पेट्रोलच्या दरात लिटरमागे 2 रुपये तर डिझेलच्या दरात लिटरमागे 1 रुपया वाढवण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांना सध्या पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि एलपीजीच्या विक्रीमागे दररोज 135 कोटींचं नुकसान सहन करावं लागतं आहे. परिणामी तेल कंपन्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत दरवाढ करण्यात येणार असल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच पेट्रोलियम पदार्थांच्या दरात वाढीचे देशभरात काय पडसाद उमटतील याकडे अर्थतज्ज्ञांचं लक्ष लागून राहिलं आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा निर्णय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा लवकरच जाहीर करतील.

close