एअर इंडिया करणार कर्मचार्‍यांच्या पगारात कपात

June 22, 2009 3:24 PM0 commentsViews: 7

22 जून एअर इंडियावरचं वाढतं आर्थिक संकट पाहता येत्या काही दिवसात अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पगारात आणखी कपात होण्याची शक्यता कंपनीनेआहे. एअर इंडियाचे अध्यक्ष अरविंद जाधव यांनी कर्मचार्‍यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात कंपनीच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीसाठी सरकारला दोष देण्यात आला आहे. सध्या एअर इंडिया कर्मचार्‍यांवर एकूण 500 कोटींचा खर्च करते. कंपनीवर आलेलं आर्थिक संकट पाहता आता या खर्चात कंपनी अजून कपात करणार आहे. कंपनीच्या आर्थिक तोट्यात सरकारकडून आता लवकर आर्थिक मदत मिळेल याची एअर इंडियाला शक्यता आहे.आर्थिक मंदीमुळे जवळपास सगळ्याच देशांच्या सरकारी विमान कंपन्या धोक्यात आल्या आहेत. ब्रिटिश एअरवेजने आतापर्यंत 2 हजार 500 लोकांना कमी केलं आहे. तर जपान एअरलाईन्सने 1200 कर्मचारी कमी केले. अमेरिकन एअरलाईन्स ऑगस्ट 2009पर्यंत 1600 कर्मचारी कमी करणार आहे. तर जानेवारी ते मे महिन्याच्या दरम्यान जेट एअरवेजने 800 कर्मचारी काढून टाकलेत.

close