असा हा डॉग शो !

November 17, 2014 7:52 PM0 commentsViews:

17 नोव्हेंबर : पिंपरी चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय डॉग शोचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत 35 जातीचे तब्बल 270 कुत्रे सहभागी झाले होते. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन, ग्रेट डेन, अफगाण हाऊंड, नेपोलियन मॅस्टीफ, बुल मॅस्टीफ, रॉटवायलर, गोल्डन रिट्रीव्हर, तिबेटीयन मॅस्टिफ, बुलडॉग, बल्गेरियन शेफर्ड, सायबेरियन हस्की या आणि इतर जातीच्या कुत्र्यांनी आपली कला परीक्षकांसमोर सादर केली. या शोचं मुख्य आकर्षण ठरला तो फक्त बर्फाळ प्रदेशात आढळणारा सायबेरीयन हस्की हा कुत्रा. हा शो बघण्यासाठी अनेकांनी आवर्जून हजेरी लावली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचाही समावेश होता.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close