गोड साखरशाळांची कडू कहाणी !

November 17, 2014 8:46 PM0 commentsViews:

maharashtra cane workersमच्छिंद्र टिंगरे, बारामती

17 नोव्हेंबर : राज्यात ऊसतोडणी कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा…एकीकडे मुलांच्या शिक्षणासाठी कायदे आहेत. पण आजही ऊसतोडणी कामगारांची हजारो मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ना सरकार घेतं ना कारखाने…

दरवर्षी मराठवाडा, विदर्भातून हजारो ऊसतोडणी कामगार पश्चिम महाराष्ट्रात दाखल होतात. या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हे कामगार मुलांना आपल्यासोबत घेऊन जातात. त्या ठिकाणी हे कामगार पालं टाकून राहतात. तिथं शाळांची सोय नसते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची परवड होते. आपल्या मुलांवरही आपल्याप्रमाणे ऊस तोडायची वेळ येऊ नये म्हणून त्यांच्या शाळेची सोय व्हावी अशी मागणी हे मजूर करतात.

या मजुरांच्या मुलांसाठी साखरशाळा सुरू करण्यात आल्यात. मात्र या शाळेत पटनोंदणी 30 सप्टेंबरच्या आधीच केली जाते. प्रत्यक्षात ऊसतोडणी कामगार ऑक्टोबरनंतर जातात. त्यामुळे या शाळांचा पट शून्य दाखवला जातो आणि शाळा रद्द केल्या जातात. याचा फटका ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना बसतो.

पोटाची खळगी भरण्यासाठी कामगारांना दूर जावं लागतं, त्यात त्यांच्या अनेक पिढ्या गेल्या… पुढच्या पिढ्यांचं भवितव्य तरी उज्ज्वल असावं…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close