काँग्रेस आयोजित नेहरूंच्या परिषदेसाठी एनडीएला निमंत्रण नाही !

November 17, 2014 11:09 PM0 commentsViews:

sonia_vs_modi17 नोव्हेंबर : नेहरू कुणाचे ? यावरून काँग्रेस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता काँग्रेसने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर मंथन करण्यासाठी दोन दिवसांचं आंतराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेला जगभरातील मान्यवर नेते येणार आहे पण सत्ताधारी एनडीए सरकारला निमंत्रणच देण्यात आलं नाहीये.

काँग्रेस एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजित करत आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेविषयी बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की,’धर्मनिरपेक्षतेवर पं.नेहरूं यांचा विश्‍वास होता आणि भारत धर्मनिरपेक्षतेशिवाय आपलं अस्तित्व टिकवू शकणार नाही’. या परिषदेला एनडीएमधील पक्ष सोडले तर बाकी पक्षांना या परिषदेसाठी बोलावलं जाणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या परिषदेला येणार आहेत. याशिवाय 52 देशांतून नेते येणार आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close