राजू शेट्टी आणि कपिल पाटील तिसर्‍या आघाडीसाठी एकत्र

June 22, 2009 5:59 PM0 commentsViews: 9

22 जून राज्यात तिसर्‍या आघाडीसाठी प्रयत्न सुरू झाले असून ती स्थापण्यासाठी खासदार राजू शेट्टी आणि आमदार कपिल पाटील एकत्र आले आहेत. राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असून आमदार कपिल पाटील हे लोकभारतीचे प्रमुख आहेत. काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजपच्या युतीशिवाय एक वेगळा पर्याय राजू शेट्टी आणि कपिल पाटील यांना उभा करायचा आहे. या नव्या तिसर्‍या राजकीय आघाडीमध्ये शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, शहरी कामगार, शिक्षक यांना एकत्र आणण्याचा त्या दोघांचा विचार आहे.

close