राज्यात सापडला H1N1 ची लागण झालेला तिसरा रुग्ण

June 23, 2009 7:00 AM0 commentsViews: 6

23 जून राज्यात H1N1 ची लागण झालेला 24 वर्षांचा तिसरा रूग्ण पुण्यात सापडला आहे. त्याला पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हा तरुण 16 जूनला अमेरिका आणि इंग्लंडहून पुण्याला परतला होता. त्यानंतर तो लखनौ आणि दिल्ली इथे प्रवासासाठी गेला होता. तिथून पुण्यात आल्यानंतर त्याला H1N1 ची लक्षणं दिसू लागल्याने तो नायडूमध्ये दाखल झाला. सोमवारी रात्री त्याचे लॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह मिळाल्याची माहिती आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ. प्रदीप आवटी यांनी दिली आहे.महाराष्ट्रात आता H1N1 ची साथ पसरू लागली आहे. सोमवारी 22 जूनला ऑस्ट्रेलियावरून मुंबईत परतलेल्या एका तरुणीला H1N1 ची लागण झाल्याने तिच्यावर सध्या मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. तर न्यूजर्सीतून मुंबईत परतलेल्या एका 36 वर्षीय व्यक्तीलाही H1N1 ची लागण झाल्याने तोही कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहे. याशिवाय H1N1 ची लागण असल्याचे दोन संशयित रुग्ण सध्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

close