नुकसानीच्या धक्क्यामुळे शेतकर्‍याचा हार्टऍटॅकने मृत्यू

November 18, 2014 7:24 PM0 commentsViews:

farmer_news18 नोव्हेंबर : राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा हवालदील झालाय. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची आयुष्य उद्‌ध्वस्त होत आहे. नाशिकमधल्या अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाचा एका शेतकर्‍याने एवढा धसका घेतला की शेतातच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

सटाणा तालुक्यातील वनोलीमध्ये लक्ष्मण आनंदा अहिरे यांची डाळिंबाची बाग आहे.पण अवकाळी पावसाने या डाळिंबाचं मोठ्ठं नुकसान झालंय. झालेल्या नुकसानाची आज सकाळी ते पाहणी करत होते. आता कर्ज कसे फेडावे या चिंतेत असलेल्या अहिरेंचा शेतातच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं दु:ख व्यक्त करतानाच आतातरी सरकार शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईबद्दल गंभीर होणार का असा सवाल शेतकरी करत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close