विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत फेडररची विजयी सलामी

June 23, 2009 7:51 AM0 commentsViews: 6

23 जून टेनिसमध्ये दुस-या क्रमांकावर असणा-या रॉजर फेडररने विम्बल्डनच्या पहिल्याच दिवशी विजयी सलामी दिली. फेडररने पहिल्या राऊंडमध्ये चायनीज तायपेईच्या येन सु लूचा 7-5, 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये लूने फेडररला चांगलचं झुंजवलं. पण त्यानंतर फेडररने आपला खेळ उंचावत लूला मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधीच दिली नाही आणि आरामात विजय मिळवत विम्बल्डनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

close