दिल्लीत पोलिसांनी केला सामूहिक बलात्कार : महिलेचा आरोप

June 23, 2009 8:18 AM0 commentsViews: 2

23 जूनदिल्लीतल्या इंद्रपुरी पोलीस स्टेशनचा एसएचओ आणि चार कॉन्स्टेबलने चौकशीसाठी आणून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिला इंद्रपुरीच्या जे.जे.कॉलनीमध्ये राहते.सोमवारी सकाळी 10:30 वाजता दोन पोलीस तिच्या घरी आले आणि तिच्या नव-यावरच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तिला इंद्रनगर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यावेळी पाच पोलिसांनी दुपारी आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा महिलेने आरोप केला आहे. दरम्यानइंद्रपुरीच्या जे.जे.कॉलनीत राहणा-या संतप्त रहिवाशांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक केली. त्यानिदर्शकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आरोपी पोलिसांवर कोणतीही कारवाईकरण्यात आली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आता हे प्रकरण जिल्हा गुन्हे शाखेच्या महिलासेलकडे वर्ग करण्यात आलं आहे.

close